अर्जाची पद्धत


खालील मदत अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट घ्यावी. तो सुवाच्च अक्षरात पूर्ण भरावा. त्यासोबत योग्य कागदपत्रे जोडून आमच्या पत्रव्यवहाराच्या पत्त्यावर साध्या पोस्टाने पाठवावा. रु. ८००/- एन इ एफ टी (NEFT) मंडळाच्या बँक खात्यात जमा करावे व त्याची माहिती मंडळास कळवावी
तसेच जमीनदाराच्या उत्पनाचे दाखले, आयकर विवरण पत्र (income tax return acknowledgement), पॅन कार्ड, आधार कार्ड ची प्रत (self attested)सोबत जोडावे आम्ही त्याची तपासणी करुन योग्य जामीनदार निवडून आपणास वचनपत्र (Promissory Note) पाठवू.
ते (Promissory Notes) संबंधितांकडून स्वाक्ष-या घेऊन व विद्यार्थी सभासदत्वाचा अर्ज भरून संस्थेच्या नावे पाठवावे. नंतर आपणास ठरलेल्या रकमेचा धनादेश पाठवण्यात येईल किंवा विद्यार्थ्याच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येईल.

आर्थिक साहाय्याची रक्कम ठरविण्याचा अंतिम निर्णय व्यवस्थापक समितीचा राहील.


मदत अर्ज     (Updated on 21 June 2025)

मदत अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांची सूची     (Updated on 29 June 2024)

विद्यार्थी सभासदत्वाचा अर्ज